बहात्तर लाखाहून अधिक किंमतीची झाडे जप्त
धाराशिव प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख समाधान उघडे यांनी आपल्या शेतात अफूची लागवड केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शेतातून मोठ्या प्रमाणात अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत. उघडे हे धड पडल्याची माहिती मिळताच फरार झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यात दशमेगाव येथे उघडे यांच्या शेतावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली असता तिथे अफूची शेती केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तब्बल ७२ लाख ८४ हजार रुपये किंमतीची ४८५ किलो वजन असलेली अफूची झाडे जप्त केली आहेत.
उघडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.





