March 23, 2026 2:29 pm

‘आमच्या पक्षांतर्गत बाबींमध्ये लुडबूड करू नका’

रोहित पवार यांना हसन मुश्रीफ यांनी सुनावले 

मुंबई प्रतिनिधी

विमान अपघातात मरण पावलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आहे आमदार रोहित पवार यांचे काका आहेत. त्यांच्या अपघाताबद्दल रोहित पवार यांनी शंका व्यक्त करणे आणि त्याच्या निराकरणासाठी पाठपुरावा करणे समजू शकते. मात्र, आमच्या पक्षांतर्गत बाबींमध्ये त्यांनी लुडबूड करू नये, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व राज्यातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहित पवार यांना सुनावले.

रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन विमान अपघाताबाबत अनेक शंका व्यक्त केल्या आहेत. त्याचे अभ्यासपूर्ण सादरीकरण देखील केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांकडे केली असून या अपघाताबाबत कोणत्याही शंका राहू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आमच्या मनात असलेल्या शंका ही आम्ही वेळोवेळी व्यक्त केले आहेत, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.

विमान अपघाताबाबत शंका निर्माण करतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण व अन्य बाबीमध्येही रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. अजित पवार यांच्यापासून पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तटकरे हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे. पक्षासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. असे असताना आत्ताच ते खलनायक कसे ठरू शकतात, असा सवालही मुश्रीफ यांनी केला.

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर मी यापूर्वीही अनेकदा बोललो आहे. अजित पवार यांच्याकडून याबाबत चर्चा सुरू होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा समावेश नव्हता. मात्र, ही चर्चा झालीच नाही असा दावा मी कधीही केलेला नाही. अर्थात, सध्याच्या दादांच्या पश्चात बदललेल्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला विश्वासात घ्यावेच लागेल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment