March 23, 2026 2:28 pm

‘वैमानिकावर.कोणाचा दबाव होता का?’

कसून चौकशीची रोहित पवार यांची आग्रही मागणी

मुंबई प्रतिनिधी

अहमदाबाद विमान अपघाताची वस्तुस्थिती उघड झाल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संशय अधिक गडद झाला असल्याचे नमूद करतानाच दादांच्या वैमानिकावर कोणाचा दबाव होता का, याची कसून चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमाद्वारे केली आहे.

अहमदाबाद येथे तब्बल २६० जणांचा बळी घेणारा अपघात मुख्य वैमानिकाने इंजिनला इंधन पुरवठा करणारे बटण बंद केल्याचा निष्कर्ष निघाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे..हा वैमानिक मनोविकाराने ग्रस्त असल्याचा दावा करण्यात आला असून त्यांच्या वडिलांनी मात्र तो फेटाळला आहे. तसेच वैमानिकांच्या संघटनेनेही याचा निषेध केला आहे. अपघातच्या मूळ कारणांकडे कानाडोळा करून वैमानिकावर खापर फोडण्याचा हा प्रकार असल्याचा त्यांचा आरोप आहे.

मात्र, या वृत्तामुळे अजितदादांच्या विमान अपघातातील संशय वाढला असून त्याच्या कारणांची सखोल चौकशी व्हावी, या मागणीचा रोहित पवार यांनी पुनरुच्चार केला आहे.

Leave a Comment