March 23, 2026 2:24 pm

‘आपला सहभाग सिद्ध झाला तरच देऊ राजीनामा’ 

लाच प्रकरणी नरहरी झिरवळ यांचे स्पष्टीकरण 

मुंबई प्रतिनिधी

औषध दुकान परवाना निलंबन प्रकरणी लाच घेण्याचा घडलेला प्रकार अत्यंत अयोग्य असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. या प्रकरणात आपला सहभाग सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ असेही त्यांनी सांगितले.

लातूर येथे परवाना रद्द झालेल्या औषध दुकानाच्या मालकाकडून कारवाई रद्द करण्यासाठी 35 हजार रुपयाची लाच स्वीकारताना नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कार्यालयाला सील ठोकण्यात आले आहे.

याप्रकरणी झिरवाळ यांनी दिल्लीतून पत्रकारांशी संवाद साधला. आपण मागील तीन दिवस दिल्ली येथे आहोत. मुंबईत आल्यावर बैठक घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करू. या प्रकरणातील सहभागी असलेल्या कोणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात सहभागी असलेला लिपिक राजेंद्र ढेरंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील असून त्याला उसनवारीने आपल्या विभागात घेण्यात आले आहे. सुनावणीची कागदपत्र तयार करण्याचे काम तो करतो. त्याला पाठीशी घातले जाणार नाही. जाब द्यावाच लागेल, असेही झिरवाळ यांनी सांगितले.

Leave a Comment