April 10, 2026 2:06 am

लक्ष्मी रोडवर ‘राया’चे दिमाखदार उद्घाटन; डिझायनर एथनिक वेअरचा नवा पर्याय

पुणे : प्रतिनिधी

शहरातील गजबजलेल्या लक्ष्मी रोड परिसरात ‘राया’ या नावाजलेल्या Men’s Designer Ethnic Wear शोरूमचा दिमाखदार शुभारंभ उत्साहात पार पडला. हुजूरपागा शाळेजवळ आयोजित या उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या शोरूमचे उद्घाटन अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, राज्यमंत्री  माधुरी मिसाळ, तसेच जयहिंद ग्रुपचे चेअरमन नागराज जैन, मुख्य संचालक दिनेश जैन आणि संचालक प्रेषित जैन उपस्थित होते.

आधुनिक आणि पारंपरिक पोशाखांचा संगम असलेले ‘राया’ हे शोरूम आता पुणेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. येथे शेरवानी, बंदगला, कुर्ता, डिझायनर सूट, इंडो-वेस्टर्न अशा विविध प्रकारच्या समारंभिक पोशाखांची समृद्ध श्रेणी उपलब्ध आहे.

या स्टोअरची खासियत म्हणजे ग्राहकांना मिळणारा वैयक्तिक अनुभव. ‘राया’मध्ये असलेल्या फॅब्रिक स्टुडिओमुळे ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार कपडे शिवून घेण्याची सुविधा उपलब्ध असून, प्रत्येक पोशाख परफेक्ट फिट आणि वैयक्तिक शैलीनुसार तयार केला जातो.

“पुणेकरांनी या वैविध्यपूर्ण वस्त्रदालनाला भेट देऊन मनपसंत पोशाखांची खरेदी करत एक अनोखा अनुभव घ्यावा,” असे आवाहन संचालक प्रेषित जैन यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें