April 10, 2026 12:27 am

११ एप्रिल रोजी  ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’ चे आयोजन

परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन

पुणे  : प्रतिनिधी

भारतातील आघाडीच्या परदेशी शिक्षण सल्लागार संस्थांपैकी एक असलेल्या Study Smart तर्फे शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत रॉयल कॉनॉट, बोट क्लब, पुणे येथे ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोफत प्रवेश असून, परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ ठरणार आहे.

पत्रकार परिषदेत Study Smart चे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन यांनी सांगितले की, बारावीनंतर किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पाहतात. मात्र योग्य विद्यापीठाची निवड, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, आर्थिक नियोजन आणि निवास व्यवस्था याबाबत अनेकांना संभ्रम असतो. हा गोंधळ दूर करण्यासाठी या फेअरची रचना करण्यात आली असून, यूके, यूएसए, आयर्लंड, जर्मनी, दुबई, युरोप आदी देशांतील ६० पेक्षा अधिक नामांकित विद्यापीठांचे प्रतिनिधी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

या फेअरमध्ये शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य, सप्टेंबर २०२६ प्रवेश प्रक्रिया, स्पॉट अॅडमिशन ऑफर्स, आयएलटीएस सवलत, तसेच शिक्षणानंतरच्या नोकरी व करिअर संधी यावर मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळाही आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच Study Smart चे प्रमाणित तज्ज्ञ समुपदेशक विद्यार्थी व पालकांना वैयक्तिक मार्गदर्शन देऊन त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करतील.

विद्यार्थ्यांच्या अधिक सोयीसाठी करिअर काउन्सेलिंग, शिक्षण कर्ज, निवास व्यवस्था, फॉरेक्स आणि प्रवास सहाय्य यांसाठी स्वतंत्र काउंटर देखील उपलब्ध असतील. विद्यार्थी व पालक विविध कर्ज पर्यायांची माहिती घेऊ शकतील, आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया समजू शकतील आणि परदेशातील शिक्षणासाठी योग्य आर्थिक पर्याय निवडण्याबाबत मार्गदर्शन मिळवू शकतील.

या फेअरचे महत्त्व अधोरेखित करताना श्री. जैन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी थेट संपर्क साधण्याची, विविध अभ्यासक्रमांची माहिती घेण्याची आणि परदेशात शिक्षणासाठी योग्य दिशा मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’साठी नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. इच्छुक विद्यार्थी व पालक https://studysmart.short.gy/cGRE88 या लिंकवर नोंदणी करू शकतात किंवा अधिक माहितीसाठी ९६५०६ ८००७२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें