April 10, 2026 3:40 am

हृदयममुळे सर्वसामान्य रुग्णांना मिळणार दिलासा

सोलापूर प्रतिनिधी

शेळगीच्या पाटील परिवाराला तीन जगद्गुरूपीठांचा आशीर्वाद असल्याचे सांगतानाच डॉ. शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवेतून ईश्वरसेवा करणाऱ्या ‘हृदयम’ला आध्यात्मिक अधिष्ठान असल्याचे प्रतिपादन श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्यक्ष शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

रविवारी, रेल्वे लाइन परिसरातील हृदयम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन युनिटचे उद्घाटन श्रीशैल जगद्गुरू यांच्यासह काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विविध मठाधीश स्वामीजी,हृदयमच्या संचालिका डॉ. मनीषा पाटील, महापौर विनायक कोंड्याल, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पक्षनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सभापती रामप्पा चिवडशेट्टी, उद्योगपती जगदीश पाटील,जिल्हा समाजकल्याण समितीचे सभापती राहुल क्षीरसागर,जयसिंग आवताडे, प्रकाश आवताडे, रामचंद्र उर्फ पिंटू पाटीलआणि पाटील परिवार यांच्यासह नव्या हॉस्पिटलचे संचालक मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमात श्रीशैल जगद्गुरूंनी आपल्या आशीर्वचनात हृदयम हॉस्पिटलच्या सेवावृत्तीचेकौतुक केले.

हृदयम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या रूपाने अद्ययावत सेवा मिळणार असल्याची बाब आनंददायी आहे. येथे रुग्णांवर आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे उपचार केले जात असल्याचे गौरवोद्गार काशी जगद्गुरूंनी काढले.

जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या सोलापूरची डॉ. शैलेश पाटील यांनी करत असलेली सेवा अभिनंदनीय असल्याचे काशी महास्वामींनी सांगितले. डॉ.शैलेश पाटील यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे केवळ व्यावसायिक हेतू नसून रुग्णांप्रती श्रध्दा आणि भक्ती असल्याचे पालकमंत्री गोरेयांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. शैलेश जगदीश पाटील, डॉ. अमोल शिवानंद पाटील, डॉ.सुनील हिलालपुरे,डॉ.गंगाधर कोरके,डॉ. श्रीकांत गव्हाणे, डॉ.अमर विभुते,डॉ.अक्षय हवालदार,श्रेय आराध्ये,डॉ.अक्षय हानशेट्टी, आदींसह इतर मान्यवर डॉक्टरांचा सहभाग आहे.

हेल्थ कार्ड योजनेचा शुभारंभ

याप्रसंगी डॉ. शैलेशकुमार पाटील फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘हेल्थ कार्ड’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. साधारणपणे ईसीजी, हृदयाची सोनोग्राफी, छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी (सीबीसी), रक्तातील साखर तसेच सीटी स्कॅन या .तपासण्यांसाठी सुमारे पाच हजार रुपय खर्च येतो. मात्र, ‘हेल्थ कार्ड धारक ज्येष्ठ नागरिकांना या सर्व तपासण्या केवळ ५०० रुपयांत उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. शैलेश पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. याशिवाय अँजिओग्राफीवर ५० टक्के सवलत तसेच औषधांवर ३० ते ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या हेल्थ कार्ड योजनेचे स्वागत होईल असा विश्वासही डॉ. शैलेश पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

और पढ़ें