मुंबई प्रतिनिधी
शिवानिका संस्थानचे संचालक आणि भोंदू अशोक खरात जितेंद्र शेळके यांचा मृत्यू हा खरात याच्या जीवाला धोका असल्याची भीती अधिक अधोरेखित करणारी घटना असून या प्रकरणी तपासाची गती वाढवली गेली नाही तर ही भीती आणि संशयाचे धुके अधिक गडद होत जाणार आहे, असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
समाजमाध्यमात प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये अंधारे म्हणतात, खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी शिवानिका ट्रस्टचे संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट अविश्वसनीय वाटते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि भीती वर्तवली आहे की, खरातच्या जीवाला धोका असू शकतो. शेळकेंची जी घटना झाली आहे, त्यामुळे खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो ही अनेकांनी व्यक्त केलेली शंका यानिमित्ताने अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे.
कदाचित खरात प्रकरणातील सत्यच बाहेर येऊ नये असे काहींना वाटते का, असा सवाल खरात यांनी उपस्थित केला. तरीही SIT तपासाची गती वाढवत नसेल. या लोकांच्या चौकश्या होत नसतील, तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढू शकतं. शेळके हे गुन्हेगार होते की नाही हे कायदा ठरवेल. त्याची शिक्षा कायद्याने द्यायला हवी. पण कुणाचाही जीव घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. पण जी घटना आज घडली, ती मात्र एकूण शासन व्यवस्था आणि तपास यंत्रणांवर प्रश्न निर्माण करणारी आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

