April 25, 2026 12:57 am

संदीप जव्हेरी यांचे निधन

सोलापूर : प्रतिनिधी

रेल्वे लाईन्स येथील रहिवासी संदीप अरविंदभाई जव्हेरी (वय 54) यांचे शुक्रवार 24 एप्रिल 2026 रोजी अल्पशा आजाराने संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, 2 लहान भाऊ, पत्नी, 2 मुली असा परिवार आहे.

जव्हेरी ऍडव्हर्टायझिंग सर्विसेसचे ते संचालक होते. मरणोत्तर त्यांनी नेत्रदान केले. ते श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ, इंडियन रेड क्रॉस सोसायटी सोलापूर सेंटर, भारती विद्यापीठ माजी विद्यार्थी, सेंट जोसेफ प्रशाला माजी विद्यार्थी, रोटरी क्लब, असे अनेक संस्थेवर ते कार्यरत होते.

सोलापुरातील जाहिरात क्षेत्रातील सावा या संघटनेचे ते माजी अध्यक्ष व सक्रिय सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. तसेच फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज मार्केटिंग आंतरप्रेनर्स या महाराष्ट्र राज्य संघटनेचे माजी उपाध्यक्ष होते.

Leave a Comment