पक्षाच्या भवितव्याबाबत शरद पवार गटात मतांतरे
पुणे प्रतिनिधी
ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला दुसऱ्यांदा मोठे खिंडार पडल्यानंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. ठाकरे गटापाटोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदार फुटणार असल्याची कुजबुज होऊ लागली. प्रत्यक्षात तसे काही घडले नसले तरीही पक्षाच्या भवितव्याबाबत वेगवेगळ्या विचार असलेले दोन गट पडल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली स्वतंत्र चूल मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. अजित पवार यांच्या निधना, अशी चर्चा आहेनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चांना वेग आला. अर्थातच त्यात सर्वाधिक पुढाकार शरद पवार गटाच्या नेत्यांचा होता. मात्र, सध्या विलीनीकरणाचा विषय पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाच्या, पर्यायाने आपापल्या राजकीय भवितव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांनी अधिक विचार करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे भवितव्य काय असावे यावरून पक्षांतर्गत दोन गट निर्माण झाले आहे. एका गटाचे म्हणणे, आपल्या विचारधारेचे मूळ असलेल्या काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करावा, असे आहे. प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांमध्ये मोठी फूट पडल्यानंतर काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी तृणमूल काँग्रेस a काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सर्व काँग्रेसचे विचारांच्या पक्षांनी मूळ काँग्रेसमध्ये विधीन व्हावे, असा विचार मूळ धरू लागला. त्याच धर्तीवर शरद चंद्र पवार पक्षातील एका गटाला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार योग्य वाटत आहे.
दुसरीकडे, विलीनीकरणाचा विचार न करता आपल्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे आणि ते सुरक्षित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबर जुळवून घ्यावे असे दुसऱ्या गटाचे मत आहे. यापूर्वी देखील अजित पवार यांच्याबरोबर न गेलेले, मात्र,, सत्ताधाऱ्यांबरोबर जुळवून घ्यावे असे मत असलेले अनेक नेते शरदचंद्र पवार पक्षात आहेत. भाजपाची वाढती आक्रमकता पाहून अन्य काही नेते देखील या मताशी सहमत होत आहेत.
भारतीय जनत पक्षाच्या विस्तारवादी भूमिकेमुळे प्रादेशिक पक्षांसमोर उभे असलेले प्रश्नचिन्ह आणि पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांची वयानुसार ढासळत असलेली प्रकृती यामुळे आपापल्या मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व असलेल्या सरंजामदारांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरदचंद्र पवार पक्षालाही भवितव्याचा विचार करणे भाग पडत आहे.









