पुणे: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अतुलनीय आणि ऐतिहासिक साहित्यिक कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) च्या ‘वर्ल्ड बुक’ मध्ये त्यांच्या या अथांग कार्याची जागतिक विक्रम (World Record) म्हणून नोंद करण्यात आली आहे. गेल्या ३३ वर्षांपासून मायमराठीच्या संवर्धनासाठी अविरत झटणाऱ्या डॉ. गोरे यांच्या या बहुमानामुळे संपूर्ण मराठी जगतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.lलोकवर्गणीतून १९६ साहित्य संमेलनांचा डोंगर!
साहित्य विश्वात डॉ. शरद गोरे हे एकमेव असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजवर तब्बल १९६ मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. विशेष म्हणजे, शासनाच्या कोणत्याही अनुदानावर अवलंबून न राहता ही सर्व संमेलने केवळ लोकवर्गणीतून पार पडली आहेत. यामध्ये ग्रामीण, नवोदित, युवा, पर्यावरण, शिक्षक, तसेच महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,राजमाता जिजाऊ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर,नारायण सुर्वे,जनकवी पी.सावळाराम,राजकुमार काळभोर यांच्या नावांनी सुरू केलेल्या प्रबोधनपर संमेलनांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी ‘मॉरिशस आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन’ घेऊन मराठीची पताका सातासमुद्रापार फडकवली आहे.
अष्टपैलू साहित्याचा सुवर्णप्रमूलत: सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रूकचे रहिवासी असलेले व सध्या पुण्यात स्थायिक असलेल्या डॉ. गोरे यांचे कार्य केवळ संमेलनांपुरते मर्यादित नाही:
वक्तृत्व आणि लेखन: एक फर्डे वक्ते म्हणून त्यांनी आजवर विविध विषयांवर २ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. तसेच त्यांनी १० ग्रंथांचे लेखन केले असून, छत्रपती संभाजी महाराज लिखित ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी केलेला मराठी काव्यानुवाद प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.पुस्तक प्रकाशन: त्यांच्या ‘युगंधर प्रकाशन’ संस्थेने आजवर १५५ दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून नव्या लेखकांना व्यासपीठ दिले आहे.
चित्रपटसृष्टीत ठसा: लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि संगीतकार अशा अष्टपैलू भूमिकेतून त्यांनी ५ मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या ‘एक प्रेरणादायी प्रवास – सूर्या’ या चित्रपटाला कान्स आणि बर्लिन सारख्या जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवण्यात आले आहे.









