विलीनीकरणाबाबत काँग्रेस कडून कोणताही प्रस्ताव नाही: सुप्रिया सुळे

पुणे प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या संदर्भात काँग्रेसकडून आपल्या पक्षाला कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. याच वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या फोडफोडीच्या राजकारणावर कठोर टीका केली.

प बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि पक्षात पडलेली उभी फूट या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस देखील काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. मात्र, सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसकडून असा कोणताही प्रस्ताव नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत याबाबत कोणतीही चर्चा नाही, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला नेमकी सुरुवात कुठून झाली याची कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपने ज्या पद्धतीने प्रथम शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तोच प्रकार आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीमध्ये केला आहे, अशी टीका सुळे यांनी केली. आम्ही मात्र कधीही पक्ष किंवा घराण्यात फूट पाडण्याचे राजकारण केले नसल्याचा दावाही त्यांनी केला

Leave a Comment

और पढ़ें