डॉ.शरद गोरे यांची माहिती
पुणे प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ५ राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलन १६ ॲागस्ट २०२६ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे येथे होणार आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका आरती झोटिंग यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी दिली आहे,

स्त्रीवादी लेखनासाठी सौ.झोटिंग या विशेष ओळखल्या जातात,परिवर्तनवादी विचारधारा त्यांच्या लिखाणाच्या क्रेंद्रस्थानी आहे,मनकवडा ह्या त्यांच्या काव्यसंग्रहासह त्यांनी ५ ग्रंथाचे विपुल लेखन केले असून विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे,
साहित्य संमेलनाच्या नियोजना संदर्भात श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे येथे बैठक संपन्न झाली, या बैठकीस साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, पुणे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे,सुकाणू समिती सदस्य किशोर टिळेकर,महाराष्ट्र प्रदेश संघटक,प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगळे, प्रदेश सरचिटणीस विक्रम शिंदे,सुनील लोणकर,सचिव अमोल कुंभार, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष ॲड.सुमेध गायकवाड, पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर, शहर सचिव बाळकृष्ण अमृतकर,संघटक योगेश चौधरी, कार्याध्यक्ष सिंधु साळेकर पुणे विभागीय महिला उपाध्यक्ष शर्मिला गायकवाड आदीजण उपस्थित होते,
यावेळी सर्वानूमते साहित्य संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली, ग्रंथपूजनाने या संमेलनास सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ,पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, कथाकथन,कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असून मोठ्या संख्येने साहित्यिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे हे १९७ वे मराठी साहित्य संमेलन आहे.








