अब्दुल सत्तार पाळणार महायुतीचा धर्म: एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ठाणे प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडे पूर्ण बहुमत असून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील. संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याकडून युती धर्म पाळला जाईल आणि युतीचाच उमेदवार निवडून येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथे महापालिका आणि जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. अर्थातच विधान परिषदेचा हा मतदार संघ देखील भाजपकडे गेला आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असून पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाने बंडखोरी करून विधान परिषद निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला आहे.
या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक महापौर निवासस्थानी आयोजित केली. या बैठकीला खासदार सांदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संभाजीनगर मध्ये झालेल्या बंडखोरी आणि जिल्हा बँक निवडणुकीबद्दल चर्चा झाली.
अब्दुल सत्तार महायुतीचा नियम पाळतील असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेणार असं सत्तार यांनी सांगितलं. आमचे नेते शिंदेसाहेब आहेत, ते जे बोलतील ते अंतिम राहील. मुख्यमंत्र्यांना भेटणार, अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाने होईल. राज्यातील युतीला तडा जाणार नाही याची काळजी घेऊ. बैठकीमध्ये एकनाथ शिंदेनी जो निर्णय दिला, त्याचं तंतोतंत पालन होईल” असं अब्दुल सत्तार म्हणाले. सर्व आमदार, खासदारांची तब्बल साडे तीन तास बैठक चालली. उमेदवारी मागे घेण्यावर सत्तार म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार. त्यांच्याशी चर्चा करणार.

Leave a Comment

और पढ़ें