नसरापूर बालिका अत्याचार-हत्या प्रकरण: मृत्यूनंतरही देहाची विटंबना

सरकारी वकिलांचा न्यायालयात धक्कादायक खुलासा

पुणे: प्रतिनिधी

नसरापूर येथील छोट्या चिमुरडीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येच्या खटल्याच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ससून रुग्णालयाच्या शिवविच्छेदन अहवालाचा हवाला देत एक हादरवून टाकणारा खुलासा केला आहे. वैद्यकीय पुराव्यांनुसार, नराधमाने मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्या देहावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या आहेत. वैद्यकीय अहवाल, वैज्ञानिक पुरावे, बाल साक्षीदाराची साक्ष, डीएनए प्रोफाइलिंग आणि इतर महत्त्वाचे पुरावे सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केले आहेत. सोमवारी सायबर तज्ज्ञ आणि मुख्य तपास अधिकारी यांनीही आपली साक्ष नोंदवली.

ररोज नियमित सुनावणी होत असल्याने, खटल्याचा निकाल पुढील महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी वेगाने तपास करत १६ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षाने ३५५ हून अधिक कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केली आहेत.
विशेष म्हणजे, आरोपी भीमराव कांबळे याला यापूर्वी लैंगिक अत्याचाराच्या दोन गुन्ह्यांमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता, ही बाबही कोर्टात मांडण्यात आली. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीच्या गावी गेलेल्या चिमुकलीला हे भयानक स्वरूप घेणारे प्रकरण घडले होते. सरकारी पक्षाचे सर्व पुरावे पूर्ण झाल्याने, खटल्याच्या पुढील प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें