सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार

चार हुतात्मा चौकात तीव्र निदर्शने व प्रतिकात्मक अटक आंदोलन

सोलापूर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात आणि एसआयआरच्या (SIR) नावाखाली सुरू असलेल्या कथित मतचोरीच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी सोलापुरातील ऐतिहासिक चार हुतात्मा चौक येथे भव्य निदर्शने व प्रतिकात्मक अटक आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी हातात भारताचा तिरंगा झेंडा आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात घोषणा देणारे फलक घेऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. लोकशाहीच्या रक्षणार्थ आणि मतचोरी रोखण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

नेत्यांचे घणाघाती भाषण आणि मागण्या:

प्रताप चव्हाण (जिल्हाप्रमुख): “SIR च्या माध्यमातून सुरू असलेल्या मतचोरीच्या विरोधात आणि देशातील लोकशाही वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.”

शरणराज केंगनाळकर (जिल्हाप्रमुख): “सोलापुरातून पेटलेली ही असंतोषाची ठिणगी आता शांत बसणार नाही, ही आग संपूर्ण देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही.”

महेश धाराशिवकर (महानगरप्रमुख): “SIR च्या नावाखाली भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मिळून मतचोरी करत आहेत. या भ्रष्ट कारभाराबद्दल ज्ञानेश कुमार यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे.”

पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती:

या आंदोलनात पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता माने, लोकसभा प्रमुख संजय पौळ, महिला आघाडीच्या मंगल थोरात, प्रिया बसवंती, विष्णू कारमपुरी, युवा सेना प्रमुख राम वाकसे, तुषार अवताडे, संदीप बेळमकर, महम्मद मुलानी, चंद्रकांत मानवी, रमेश चौगुले, राजाभाऊ कुसेकर, दत्ता खलाटे, गेनसिद्ध काटकर, अजय खांडेकर, प्रकाश पवार, गण्णा कोरे, संतोष टोणपे, राहुल दशवंत, सोमशंकर कंठीमठ, मनोज कामेगावकर, उदय पवार आणि धर्मराज केंगनाळकर यांच्यासह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Comment

और पढ़ें